About Us

अडथळ्यांची शर्यत पार करताना या प्रवासात मला अनंत अडचणी आल्या , साहित्याची आवड आणि माणसांच्या अडी-अडचणी सोडविणे हा माझा छंद होता. कारण घरातील हे बाळकडू असल्याने तसेच माझ्या प्रवासात मी अनेकांच्या समस्या जवळून पाहिल्याने त्याचे निराकरण होऊन प्रत्येकाचे आयुष्य सुखमय व्हावे हि तळमळ होती.

साप्ताहिक कौतुक व विद्यांजली प्रकाशनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी ओळख निर्माण झालेल्याना मी कायद्याचा अभ्यास करते हे माहित होते त्यामुळे ओळखीच्या माध्यमातून लोकांना सल्ले मोफत देण्याचं काम लागल्याने व या प्रयत्नास परमेश्वरी कृपेने तसेच काही शासकीय , निमशासकीय पोलीस , वकील अशा अनेक लोकांनी निरपेक्ष मदत केली आणि म्हणूनच बऱ्याच जणांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविल्यामुळे खेडेगावातील अनेकजण एका विश्वासाने आमच्याकडे यायला लागले. अनेक संस्थामधून मी काम केलं , परंतु लोकहितापेक्षा स्वहिताकडे या संस्था पाहत असल्याने मला त्या कामाचे समाधान मिळेना, कारण लोकहितातून स्वहीतही साधले जाऊ शकते याचा प्रत्यय मला आलेला असल्याने मी स्वतःच मानवहीत संरक्षण संस्था स्थापन केली . अधिकार मागण्यापेक्षा मानवहिताचा विचार केला तर निश्चितच मानव अधिकारांचे संरक्षण केल्यासारखेच आहे.

म्हणूनच आम्ही कायद्याचा आणि कायदेशीर व्यक्तींचा आदर करतो. वर्षानुवर्षे कोर्टाच्या फेऱ्या मारून वेळ,पैसे आणि मनस्ताप वाचवायचा असेल तर काही केसेस मध्य तडजोड हाच पर्याय आहे हेच आम्ही पटवून देतो . कारण "बिनमांगे मोती मिले ,मांगे मिले ना भिक " या उक्तीनुसार समजूतदारपणातच शहाणपण आहे

आमचे ध्येय :- आजचा माणूस हा नात्यापासून, माणुसकीपासून लांब गेला आहे आणि म्हणूच आज अनेक समस्यांमधून जात आहोत. कुटुंव्यवस्था नष्ट होऊ नये ,नाती संपू नयेत , आपापसातील तेढ नष्ट व्हावी आणि प्रत्येकाला सुखाने जगण्याचा ,राहण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला पटवून देणे , तसेच संपूर्ण मानवी जीवन सुखकर व्हावे आणि मानवी जीवनाचे मूल्य प्रत्येकाला कळावे , या दृष्टीने प्रयत्न करणे हे आमचे ध्येय आहे.

वेळेचे महत्व ओळखून आम्ही सर्व प्रकारच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्या दृष्टीने प्रयत्न करतो. समाजातील विविध प्रकारच्या समस्या सोडविणे बरोबरच कौटुंबिक समुपदेशन , महिला अन्याय , अत्याचारग्रस्त , दलित , पिडीत , आर्थिक दुर्बल इ. ना न्याय मिळवून देणेकमी सर्वतोपरी सहकार्य करतो उदा. कौटुंबिक हिंसाचार बालमजूर, कुपोषण , पोटगी , समझोता , घटस्फोट , इत्यादि .....

समाजप्रबोधनात्मक उपक्रम – काव्यवाचन, कथाकथन , अभिनय, वक्तृत्व इ. फटाकेमुक्त दिवाळी, अण्णा हजारेंना पाठिंबा , स्त्रीभ्रूणहत्येवर विविध उपक्रम , गुटखा कारखान्यास विरोध, महिला सक्षमीकरण उपक्रम इ. कामे केली आहेत

आमच्या दिल्या जाणाऱ्या सेवा:-

१-लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न
२-आमची सेवा कोणत्याही राजकारणाशी संबंध नसणारी परंतु समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
३- शक्यतो कोर्टाबाहेर व जरूर पडल्यास सर्व तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न . कारण तडजोड हाच उत्तम पर्याय

Get in touch

  • +91 9860065813
  • +91 8668622632
  • Behind Gokul Hotel,
  • Tikke Building
  • Shahupuri, Kolhapur.